Posts

Showing posts from December, 2023

कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

Image
  कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा  कोपरगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक साधू-संत, महंतांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून निमंत्रणरुपी आलेल्या मंगल अक्षता कलशाची संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (२१ डिसेंबर) कोपरगाव शहरातून वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. डोक्यावर मंगल अक्षता कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या गजराने संपूर्ण कोपरगाव शहर दुमदुमून गेले होते.