कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

 कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा 



कोपरगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक साधू-संत, महंतांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून निमंत्रणरुपी आलेल्या मंगल अक्षता कलशाची संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (२१ डिसेंबर) कोपरगाव शहरातून वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. डोक्यावर मंगल अक्षता कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या गजराने संपूर्ण कोपरगाव शहर दुमदुमून गेले होते. 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून आणलेल्या मंगल अक्षता कलशाचे गुरुवारी दुपारी कोपरगाव शहरातील श्री वरद विनायक व श्री दत्त मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. स्नेहलताताई कोल्हे यांनी भगवान श्रीरामाचे व मंगल अक्षता कलशाचे पूजन करून अन्य सुवासिनी महिलांसमवेत डोक्यावर मंगल अक्षता कलश घेऊन शोभायात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी या महिलांसोबत फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. ही शोभायात्रा अहिंसा स्तंभाजवळ आल्यानंतर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यात सहभागी होऊन भगवा ध्वज फडकावत नृत्य केले. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जयघोष करीत भगव्या ध्वजासह टाळ, मृदंग, झांज, चौघडा व ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत अग्रभागी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची प्रतिमा ठेवलेली होती. शोभायात्रेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरी ऊर्फ उंडे महाराज, प.पू. कैलासानंदगिरी महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठातील संत निजानंद महाराज, विवेकानंद महाराज, राजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी, कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजितसिंग आदी संत, महंत सजवलेल्या रथात विराजमान झाले होते. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकलावंतांनी तसेच चित्तथरारक खेळ सादर करणाऱ्या मुला-मुलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून, औक्षण करत अक्षता कलशाचे स्वागत केले. अक्षता कलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करण्यात आली. 
श्री वरद विनायक मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी स्मारक, बिरोबा चौक, शिवाजी रोड, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, पांडे गल्ली, मोदकेश्वर मंदिर, भारत प्रेस रोड, कन्या विद्यालय, एस. जी. विद्यालयमार्गे श्रीराम मंदिराजवळ आल्यानंतर तेथे तिचा समारोप झाला. यावेळी श्रीराम मंदिराचे प्रमुख अमरनाथ लोंगाणी यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. या ठिकाणी स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.   
शोभायात्रेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, विनोद राक्षे, शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, राजेंद्र सोनवणे, मंगेश पाटील, विजय वहाडणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, विजय वाजे, जयंतीलाल पटेल, अमरनाथ लोंगाणी, शिवसेनेचे कैलास जाधव, सनी वाघ, भैय्या तिवारी, माजी नगरसेवक बबलू वाणी, अशोकराव लकारे, संजय जगदाळे, बापू पवार, गणेश आढाव, शिवाजीराव खांडेकर, वैभव गिरमे, वैभव आढाव, नारायणशेठ अग्रवाल, महावीर दगडे, दिलीप घोडके, स्वच्छतादूत सुशांत घोडके, गोपीनाथ गायकवाड, प्रदीप नवले, सुभाष परदेशी, टेकचंद खुबाणी, संतोष गंगवाल, पप्पूसिंग पोथीवाल, सेवासिंग सहानी, मनिंदरसिंग भाटिया, सनीसिंग पोथीवाल, परमजितसिंग भाटिया, जॅकीसिंग दिगवा, दीपासिंग ठकराल, विनोदसिंग ठकराल, चंदूशेठ पापडेजा, बहादुरसिंग भाटिया, बादलसिंग पोथीवाल,कुकूशेठ सहानी, कलविंदरसिंग दडियाल, मनोज बत्रा, जोगिंदर भुसारी, विजय चव्हाणके, सचिन सावंत, जयेश बडवे, प्रसाद आढाव, सोमनाथ गंगुले, जयवंत जोशी, स्वप्निल मंजुळ, विनायक गायकवाड, जगदीश मोरे, पी. टी. वाणी, विशाल झावरे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, अजय गांधी, शाम डागा,राजेंद्र घुमर, राकेश काले, डॉ.अनिल जाधव, संदीप निरभवणे, प्रदीप चव्हाण आदींसह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, रामभक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Comments

Popular posts from this blog

शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, कोपरगावात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती.

कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण

महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.