महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.

 महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न.



         कोपरगाव  : पक्षसंघटना व पक्ष यापेक्षा स्वतःची महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याची खंत  भाजप नेते व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली .कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि.11-8-2024 रोजी हॉटेल विरा पॅलेस च्या हॉल मध्ये संपन्न झाली. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा.तालुका सरचिटणीस छंनुदासजी वैष्णव होते.

जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व जुन्या कार्यकर्त्यानी पुन्हा नव्या उमेदीने उभारी घ्यावी व जिल्ह्यातील व तालुक्यातील  पक्ष संघटना अधिक मजबुत करावी आणि महाराष्ट्रात भाजपा पुन्हा सत्तेवर आण्यासाठी प्रयत्न करावे  असे आवाहन केले.

यावेळी सर्वस्वी चेतन खुबाणी, सुभाष दवांगे,भाऊसाहेब कासार, प्रकाश सवई, हरिभाऊ लोहकणे, मंगेश सिंनगर,योगेश वाणी, रविकिरण ढोबळे,रवि आगलावे,सतीश चव्हाण, पी आर.काळे, विनायक गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत कोपरगाव ची जागा भाजपा ला सोडण्याची मागणी देखील पुढे आली.

 तसेच   काही कारणास्तव भाजपा ला ही जागा मिळाली नाही तर पक्ष आदेश देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व जुने कार्यकर्ते तन मन धनाने प्रयत्न करतील असा देखील निश्चय करण्यात आला.

 येत्या काळात मा.नरेंद्रजी मोदी,व मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे पुर्ण ताकदीने उभे राहून जास्तीत जास्त जागा निवणून आण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष दवांगे, यांनी तर सूत्रसंचालन चेतन खुबाणी यांनी केले तर किरण थोरात  यांनी आभार मानले


Comments

Popular posts from this blog

शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, कोपरगावात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती.

कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण