शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, कोपरगावात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती.

 शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, तर भगवान मथुरे कोपरगाव चे नवीन पोलीस निरीक्षक 


कोपरगाव प्रतिनिधी:----  केंद्रिय निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता 

 दिनांक 12 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 38 अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश शोला यांच्या सहीने बदली ऑर्डर काढण्यात आले असून जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आले आहे. यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेत निरिक्षक पदी  बदली करण्यात आली असून सध्या संगमनेर येथे असलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि मयूर भामरे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सध्या सोनई येथे असलेले आशिष शेळके यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे. 

पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात शहरातील वाढती गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु अपुरा मनुष्यबळ असल्याने त्यांना काम करताना मोठ्या अडचणी आल्या. नव्या हजर होणारे दोन्हीही अधिकाऱ्यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे परंतु कोपरगावात आल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करतात? वाढती गुन्हेगारी रोखण्यात आणि पोलीस खात्याचा धाक निर्माण करण्यामध्ये यशस्वी होणार का ? याकडे आता कोपरगाव शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण

महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.