Posts

कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण

Image
  कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण   कोपरगाव प्रतिनिधी:----- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शंकरराव गहीनाजी चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. ही परंपरा

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या राहुल जगधनेची वार्षिक पॅकेज रू २७ लाखांवर निवड--- अमित कोल्हे

Image
  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या राहुल जगधनेची वार्षिक  पॅकेज रू २७  लाखांवर    निवड--- अमित कोल्हे   संजीवनीच्या ऑटोनॉमस दर्जाचे फलित कोपरगांव प्रतिनिधी:----   संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वेगवेगळ्या कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित  केल्या जाते. याचाच परीपाक म्हणुन जस्पे टेक्नॉलॉजिज या बंगळूर स्थित कंपनीने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या राहुल कैलास जगधनेची कसुन मुलाखत घेवुन त्याची वार्षिक  पॅकेज रू २७ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ऑटोनॉमस दर्जाचे हे फलित आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.          श्री कोल्हे पुढे म्हणाले की अनेक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंते मिळत नाही, तर अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळत नाही, हे वास्तव संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी  जानले. ही विसंगती दुर करण्यासाठी स्व. कोल

शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, कोपरगावात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती.

Image
  शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, तर  भगवान मथुरे कोपरगाव चे नवीन पोलीस निरीक्षक  कोपरगाव प्रतिनिधी:----  केंद्रिय निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता   दिनांक 12 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 38 अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश शोला यांच्या सहीने बदली ऑर्डर काढण्यात आले असून जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आले आहे. यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेत निरिक्षक पदी  बदली करण्यात आली असून सध्या संगमनेर येथे असलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि मयूर भामरे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सध्या सोनई येथे असलेले आशिष शेळके यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २७ अभियंत्यांना टीसीएस कंपनीमध्ये नोकऱ्या.

Image
  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २७ अभियंत्यांना टीसीएस कंपनीमध्ये नोकऱ्या.        ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची दमदार घौडदौड कोपरगाव प्रतिनिधी:-----  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातुन टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीने संजीवनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील तब्बल २७ नवोदित अभियंत्यांची वेगवेगळ्या  वर्गवारीनुसार वार्षिक  पॅकेज रू ३. ४ लाख ते रू ९ लाख देवु करून नवकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशा  प्रकारे ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची दमदार घौडदौड सुरू असल्याचे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की टीसीएस प्राईम वर्गवारीमध्ये ऋचा रूद्रभाटे, निलम प्रभाकर हर्दे व विशाल अशोक  चौधरी यांची निवड झाली आहे. टीसीएस डीजिटल वर्गवारीमध्ये हर्षालीनी  बाळु पांढरे, पुजा संजीव जाधव, जयवंत बाळासा

वह्यांचे वाटप स्तुत्य उपक्रम – सौ.पुष्पाताई काळे

Image
  वह्यांचे वाटप स्तुत्य उपक्रम – सौ.पुष्पाताई काळे     – समाजात शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत म्हस्के कुटुंबीय मागील सहा वर्षापासून दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आहे. यामध्ये कधी दफ्तर, कधी बूट सॉक्स व यावर्षी वह्या वाटप केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के व सौ. लतिका म्हस्के यांच्या वतीने कोपरगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ३ या शाळेतील सर्वच विद्यार्थिनींना सौ. पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे  वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की ,  विद्यार्थींनिंनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घ्यावा. चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पाल

महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.

Image
 महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न.          कोपरगाव  : पक्षसंघटना व पक्ष यापेक्षा स्वतःची महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याची खंत  भाजप नेते व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली .कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक जुने कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि.11-8-2024 रोजी हॉटेल विरा पॅलेस च्या हॉल मध्ये संपन्न झाली. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा.तालुका सरचिटणीस छंनुदासजी वैष्णव होते. जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व जुन्या कार्यकर्त्यानी पुन्हा नव्या उमेदीने उभारी घ्यावी व जिल्ह्यातील व तालुक्यातील  पक्ष संघटना अधिक मजबुत करावी आणि महाराष्ट्रात भाजपा पुन्हा सत्तेवर आण्यासाठी प्रयत्न करावे  असे आवाहन केले. यावेळी सर्वस्वी चेतन खुबाणी, सुभाष दवांगे,भाऊसाहेब कासार, प्रकाश सवई, हरिभाऊ लोहकणे, मंगेश सिंनगर,योगेश वाणी, रविकिरण ढोबळे,रवि आगलावे,सतीश चव्हाण, पी आर.काळे, विनायक गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत कोपरगाव च

सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन

Image
  सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन     कोपरगांव:  गौतम पब्लिक स्कूल प्राचार्य नूर शेख यांचे सुपुत्र उदगीर लातूरचे डीवायएसपी सोहेल शेख यांचे नुकतेच गौतम पब्लिक स्कूलमध्ये  ' सायबर गुन्हे '  या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.  यामध्ये  विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, गंभीरता ,  सतर्कता व त्यासंबंधी असलेले महत्वपूर्ण कायदे याबद्दल सखोल माहिती डीवायएसपी सोहेल शेख यांनी गौतमच्या विद्यार्थ्यांना दिली. शेख यांनी सांगितले की ,  एकविसावे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याची वाढ होताना दिसून येत आहे. आजकाल यामध्ये अनेक गुन्हेगारी वृत्तीचे लोक सक्रिय असून त्यांच्या मार्फत सर्रास लोकांना फसवले जात आहे. मोबाईल वर अनेक प्रकारचे प्रलोभनात्मक खोटे संदेश येतात आणि साक्षर लोक सुद्धा यास बळी पडत आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच ओटीपी ,  एटीएम पिन सांगू नये. सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करून विनाकारण एखादा विडिओ लाईक करणे ,  कमेंट करणे किंवा शेयर करणे टाळावे. जातीवा