सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन

 सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये

डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन

 




 कोपरगांव: गौतम पब्लिक स्कूल प्राचार्य नूर शेख यांचे सुपुत्र उदगीर लातूरचे डीवायएसपी सोहेल शेख यांचे नुकतेच गौतम पब्लिक स्कूलमध्ये 'सायबर गुन्हेया विषयावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. 

यामध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, गंभीरतासतर्कता व त्यासंबंधी असलेले महत्वपूर्ण कायदे याबद्दल सखोल माहिती डीवायएसपी सोहेल शेख यांनी गौतमच्या विद्यार्थ्यांना दिली. शेख यांनी सांगितले कीएकविसावे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याची वाढ होताना दिसून येत आहे. आजकाल यामध्ये अनेक गुन्हेगारी वृत्तीचे लोक सक्रिय असून त्यांच्या मार्फत सर्रास लोकांना फसवले जात आहे. मोबाईल वर अनेक प्रकारचे प्रलोभनात्मक खोटे संदेश येतात आणि साक्षर लोक सुद्धा यास बळी पडत आहेत.


कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच ओटीपीएटीएम पिन सांगू नये. सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करून विनाकारण एखादा विडिओ लाईक करणेकमेंट करणे किंवा शेयर करणे टाळावे. जातीवाचक धर्मांबद्दल टीका टिप्पणी करू नये. अन्यथा शिक्षेस पात्र व्हाल असा सावधानतेचा इशाराही त्यांनी दिला. सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवावे तसेच सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी शेख यांनी सर्व विद्यार्थीशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना केले. तसेच समस्या निर्माण झाल्यास ११२ वर संपर्क साधावा असे सांगितले.

यावेळी डीवायएसपी सोहेल शेख यांचा सत्कार शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षिका ज्योती शेलार व प्राथमिक विभाग प्रमुख राजेंद्र आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकविद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले ते आभार रमेश पटारे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची बदली,, कोपरगावात नवीन पोलीस निरीक्षकाची नियुक्ती.

कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण

महत्वकांक्षा मोठी ठेवणाऱ्या वृत्तीच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत-- विजय वहाडणे.