कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण
कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण कोपरगाव प्रतिनिधी:----- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शंकरराव गहीनाजी चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. ही परंपरा